माझे रामायण येथे हे वाचायला मिळाले:
रामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे!’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही! विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, ...