प्रसाद गोडबोले यांच्या प्रतिक्रियेतील शेवटचे वाक्य वाचून खेद वाटला. कोणत्याही विषयावर चर्चा सुरू असताना त्यात सहभागी होणारे आपल्या मनात येणारे प्रश्न उपस्थित करत असतात. ते इतरांना पटले नाहीत तर त्याचा प्रतिवाद करता येतो. असहमती दर्शवता येते. त्याऐवजी त्या प्रतिक्रियेला मूर्ख व निर्लज्ज म्हणून आपण काय मिळवतो? बरं ज्या प्रश्नांवर आपण हे ताशेरे ओढतो ते इतरांच्याही मनात येऊ शकतात ना? आपल्याला एखाद्याचे मत पटले नाही म्हणजे लगेच तो अथवा त्याची प्रतिक्रिया मूर्ख अथवा निर्लज्ज कशी काय ठरते?

परवा नगर येथे एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, की भारतीय महिलांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे अथवा उत्तान वेशभूशेचे अनुकरण करण्यापेक्षा संसार व मुलाबाळांना चांगले वळण लावण्यावर भर द्यावा म्हणजे निदान मुलींना अशा प्रसंगांना तोंड देण्याचे प्रकार कमी होतील. '

या प्रतिक्रियेशी कुणी सहमत होवो अथवा न होवो, पण ही एका ज्येष्ठ महिलेने व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे, हे महत्त्वाचे. त्याला आपण काय म्हणणार?

आपण चर्चेतील सभ्यता गमावलीय का?