स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यात कॉलेज साठी आल्यावर मी पहिल्यांदा केळकर म्युझिअम मधे रहायला गेलो. अगदी पहिल्यांदा मला तिकीट खिडकिच्या रुम मधे एक कॉट मिळाली. पण मग मात्र मी हळू हळू प्रगती केली आणि जेव्हा तिथून बाहेर पडलो तेव्हा मी मस्तानी महालात राहात होतो. तिथे येणारे देशी आणि परदेशी पर्यटकांमुळे माझ्या अभ्यासात सारखा खंड पडायला लागला आणि माझा कॉलेजचा पसाराही वाढायला लागला तेव्हा मी थोड्या मोठ्या जागेत शिफ्ट व्हावे असे ठरवले आणि मी गेलो शनिवार वाड्यात, हो ...