माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:
’माझा भारत महान’ हे वाक्य आपण रोज हजारदा वाचत नि ऐकत असलो तरी ह्या वाक्यात सत्याचा अंश किती हे आपण सगळे जाणतोच! भारताच्या ’सत्यमेव जयते’ ह्या बोधवाक्याइतकाच या वाक्यालाही आता काही अर्थ उरलेला नाही. अर्थात कुठल्याही गोष्टीची जबाबदारी आपण स्वतःवर घेत नसल्याने या गोष्टींचे खापर आपण नालायक नेते, सडलेली यंत्रणा नि ’ईतर’ भ्रष्ट भारतीय यांच्यावर कधीच फोडून टाकले आहे. पण भारत देश हा भारतीयांनी बनलेला आहे नि भारतीयच तो चालवत आहेत हे आपण सोयीस्कररित्या विसरलो आहोत, त्यामुळे स्वत:ला सोडून इतरांना मोजणा-या चोरांसारखी आपली स्थिती झालेली आहे. स्वत: ...