@नीता
<<पण आपला मुद्दा काय होता? पुण्यात जे झाले ती काय ६ महिन्याची मुलगी होती की ६० वर्षांची म्हातारी होती? >> पुण्यात झालेली परवाची घटना हा एकमेव मुद्दा आहे असे मी कुठेही म्हटले नाहीये. ती घटना तुम्ही पकडून बसला आहात.
ते जाउ दे.
@नीता , @योगप्रभू
तुम्ही वरती अरुंधती यानी लिहिलेला प्रतिसाद वाचावा.
<<महिलांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे अथवा उत्तान वेशभूशेचे अनुकरण करण्यापेक्षा संसार व मुलाबाळांना चांगले वळण लावण्यावर भर द्यावा म्हणजे निदान मुलींना अशा प्रसंगांना तोंड देण्याचे प्रकार कमी होतील. >>
हे जर तुम्हाला पटले असेल तर " शहरापेक्षा खेड्यांमध्ये बलात्कारांचे प्रमाण जास्त आहे. जिथे बायका कोणताही आधुनिक पोषाख करत नाहीत की मर्यादा सोडून वागत नाहीत. " यावर तुम्ही काय म्हणाल ?
आणि श्रीमंत , आधुनिक पोषाख करणार्या युवतींपेक्षा गरीब , सामान्य , असहाय्य, ( ज्या पारंपारीक पोषाख करतात ) यांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे.