ज्या पाश्चात्य संस्कृती च्या नावाने आप्ण खडे फोडतोय त्या पाश्चात्य देशात मात्र अशा प्रकारचे गुन्हे आप्ल्या प्रमाणात कमी आहेत. गुन्हा घडल्यावरही बाईची चुक न शोधत बसता गुन्हेगाराला पकडून जबर शिक्षा करण्याकडे कायद्याचा तसेच समाजाचाही कल दिसतो. तसेच याहून ही महत्वाची बाब म्हण्जे ( जी मला प्रकर्षाने जाण्वली ) आप्ल्याकडे गर्दीच्या ठीकाणी बाय्कांना नको ते स्पर्ष , घाणेरड्या नजरा ई. सहन करावेच लागतात. मग त्या बाईचे वय आणि पोषाख काहीही असो. पाश्चात्य देशात असे सहसा घडताना दिसत नाही आणि घडलेच तरी गुन्हा नोंदवला जातो, शिक्षा होते.
जसे पाश्चात्य देशात सार्वजनिक स्वच्छता, वाहतुकीची शिस्त ही निर्विवादपणे आपल्या पेक्षा अतिशय उच्च प्रतीची आहे. याला कारणीभुत आहे त्यांचे शिक्षण आणि कडक कायदे जे तितक्याच कठोरतेने अमलात आणले जातात. मुलाना लहान पणापासुनच स्वच्छतेचे धडे घरात , शाळेत शिक्षकांच्या आणि पालकांच्या वागण्यातुनच मिळतात.आपल्याकडे अगदी उलट स्थिती आहे.
तसेच लैगिक अत्याचारांच्या बाबतीतही म्हण्ता येईल. आपल्याकडे मुलांना ( विशेषकरून मुलग्याना ) दिले जाणारे लैगिक शिक्षण जवळपास शुन्य. तसेच कायदे असले तरी त्यांची अमल्बजावणी ही तितक्याच कठोरपणे होताना दिसत नाही. मुलींचे पोषाख बदलून हा प्रश्न सुटणार नाही. (तसे असते तर खेड्यातून विवाहीत स्त्रियांवर बलात्कार झालेच नसते ) तर मुलांना लहानपणापासुनच योग्य शिक्षण तसेच कायद्याची माहिती आणि भीती , या गोष्टींची आवश्यक्ता आहे.