पाश्चात्य संस्कृती आणि उत्तान कपडे ही बर्याचशा बलात्कारांमागची सुप्त कारणे आहेत असे उल्लेख सर्व साधारणपणे  होतात म्हणून हे बघा :

खेडेगावातील निम्न जातीतील स्त्रिया तसेच आदीवासी स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे.

 दुवा  क्र. १   

खेडेगावातील निम्न जातीतील स्त्रिया तसेच आदीवासी स्त्रिया  यामध्ये कोणीही स्त्री पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे वर्तन करत नाही. आणि पाश्चात्य कपडे तर अजीबात घालत नाही.मजा म्हणून घराबाहेर पडत नाही. समाजाने आखून दिलेल्या  मर्यादा सोडून वागत नाही. समाजाने घालून दिलेल्या बंधनात राहुनच आपले व कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रयत्न फक्त या स्त्रिया  करत असतात.