छान.

गेल्या वर्षीं मुंबई एफ एम रेडिओवर एक कविताविषयक कार्यक्रम मालिका होणार म्हणून जाहीर केलें. एक कार्यक्रम खास सुटी काढून ऐकला. यांत निर्जीव वस्तूंवरील कविता हा विषय होता. त्यांत कांहीं फारशा प्रसिद्ध नसलेल्या कविता होत्या. त्यांत खालील कविता होती. त्या कवितेचा/ची कवि/कवियित्री कोण हें सादरकर्तीला ठाऊक नव्हतें. नांव ठाऊक असल्यास दूध्व करून कळवा असें तिनें श्रोत्यांस आवाहन केलें होतें. एक तासाचा तो कार्यक्रम संपेपर्यंत तिला नांव कळलें नसावें.

पाळणा

सुतार उत्तमसा तुजसाठी मिळविला
पाळणा रंगीत बनविला
चहूं बाजूंनीं राघू मोर बसविले
पाळण्यांत बाळ निजविलें
नीज नीज बाळा झोके देते मी तुजला
खेळून बाळ बहु दमला

आपल्याला कळवावेंसे वाटलें म्हणून लिहिलें.

सुधीर कांदळकर