आम्ही सुमारे ११ वर्षांपूर्वी केलेल्या या भागाच्या सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या. अर्थात आमची सहल अत्यंत घाईघाईत झाल्याने फार काही बघून झाले नव्हते. दार्जिलिंगच्या मानाने गंगटोक आवडले होते. नेपाळात जाऊन रोहिणीच्या बहिणीने कॅमेरा खरेदी केला पण भारतीय हद्दीत येताच कस्टम्सवाल्यांनी छापा टाकून तो ताब्यात घेतला आणि मग बरेच पैसे देऊन तो सोडवावा लागला होता हे चांगलेच लक्षात आहे. तिथे खरेदी करणे हे बेकायदेशीर आहे असे फलक जागोजागी लावले असूनही खरेदीचा मोह आवरला नाही त्याचे फळ मिळाले.
आपली प्रकाशचित्रेही (आजकाल मनोगतावर "छायाचित्रे"शब्दाला प्रोप्रायटरी अर्थ प्राप्त झाल्याने हा शब्द) उत्तम आहेत.
विनायक