अरुंधती च्या पोस्टमधलेच एक वाक्य परत इथे लिहीते:
<<कोणत्याही प्रकारे प्रोव्होकेटिव्ह वर्तन न करताही, केवळ ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर असे लैंगिक अत्याचार होतात आणि शिवाय आपण त्या स्त्रीलाच सुनावायचे का, की ती कशी चुकली म्हणून?>>
तर माझा मुळ मुद्दा हा आहे की अत्याचारीत स्त्रीलाच सुनवायला लोक का उत्सुक असतात ? ( तिच्या हातून चुक घडली असेल तरी तिला पण त्या चुकिची जाणीव झालेली असतेच की ) त्यामुळे तिने मुर्खपणा केला असे परत म्हणून तिचे मनोधैर्य आणखी खच्ची करण्यात लोकांना काय मिळते? किंबहुना अशा वेळी त्या स्त्रीच्या अकलेचे वाभाडे काढण्यापेक्षा तिला धीर देणे महत्त्वाचे नाही का? गुन्हेगारा विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही परंतु बळी पडलेल्या स्त्रीला सपोर्ट तर करू शकतो. कमीतकमी तिच्याच विरुद्ध बोलून तिचे आण्खी दुःख वाढवण्याची गरज तर नक्कीच नाही.
अर्थात इतरानी अशा उदा. वरून धडा घ्यावा हे नक्कीच.