@ अरुंधती :- मी आल्याचे पाचक बनवले आहे. ते फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे का ? अधून मधून न जमता सकाळी आणि रात्रीच खाऊ शकतो, म्हणून विचारलं.

@ मंदार :- काय योगायोग आहे, मी कालपासूनच प्राणायामाला सुरुवात केली आहे. बहुदा माझी प्रकृती पित्तप्रधान असावी. कारण मसालेदार मला आवडत आणि सहन होत नाही.

वज्रासन सुरू करतो, अन्य योगासने नावाने सुचवल्यास खूप छान होईल.

अग्निसार म्हणजे काय ?

@ प्रज्ञा :- ताक प्यायल्यावर खरंच छान वाटते. नारळाचा उपाय खरंच चांगला असावा, कारण भारतात असताना मसालेदार भाज्यांत सौ. नारळाचा कीस टाकायची तेव्हा त्रास होत नव्हता. पण इथे कधी मिळतो तर कधी नाही. पण आता मिळवण्याचा प्रयत्न करतो. आनंदाची गोष्ट म्हणजे इथलं दही मुळीच आंबट नसतं. पण त्याचं विरजण लागत नाही म्हणून सौ. नाराज असते  . असो.

सर्वांचे खूप आभार.