>>ज्या पाश्चात्य संस्कृती च्या नावाने आप्ण खडे फोडतोय त्या पाश्चात्य देशात मात्र अशा प्रकारचे गुन्हे आप्ल्या प्रमाणात कमी आहेत.
भारतात ताशी किंवा अर्ध्या तासाला असा एक गुन्हा होताना दिसतो. तर US मध्ये २००७ साली असे ८३,३३३ गुन्हे घडले आहेत. दुवा. तसेच हा दुवा पाहा विविध देशातील बलात्कारांच्या गुन्ह्यांची संख्या येथे मिळेल. अमेरिकेत ९३,१३६ गुन्हे घडले तेव्हा भारतात १५,४६८ गुन्हे घडले. तसेच, अमेरिकेत (दुवा) अमेरिकेत १०,००० लोकसंख्येत ३ गुन्हे घडले, तर भारतात १,००,००० लोकसंख्येत एक गुन्हा घडला.
हे खरे आहे की भारतात बरेचसे गुन्हे (बदनामीच्या भीतीने) नोंदवले जात नाहीत. पण पाश्चात्य देशात गुन्ह्यांचे प्रमाण कमी मुळीच नाही. उलट लोकसंख्येच्याप्रमाणात तर भारताहून कित्येक पटीत अधिक आहे.
स्त्रीयांवर होणारे अत्याचार हा सार्वदेशिक प्रश्न आहे. आणि कायद्याची आणि शिक्षेची कठोर अंमलबजावणी हा एकच त्यावरचा उपाय आहे. आणि अर्थातच अश्या गुन्ह्यांना आपण होता होईतो बळी पडू नये म्हणून घ्यायची काळजी हा ही.