काही ओळी बदलण्याचा विचार केलात तर (उद्धव - गा गागागगा गागा - गा गागागागा - गागा) वृत्ताचे बाबतीत कविता निर्दोष होईल असे वाटते.

उदा.

छेडून कोण जाते, ही हळवी तार मनाची
ऐवजी
छेडून जातसे कोणी, ही हळवी तार मनाची

आणि

होईल कधी ना ठावे, बरसात ती फुलांची
ऐवजी
होईल कधी ना ठावे, गंधित बरसात फुलांची

असा काहीसा बदल सुचवावासा वाटतो.

अर्थात अधिकार तुमचाच आहे.