परंतु अमेरिकेतील अठरा वर्षांच्या आजवरच्या माझ्या वास्तव्यात मी रस्त्यावर नग्नपणे किंवा केवळ अंतर्वस्त्रांनिशी भटकणारी स्त्री पाहिलेली नाही हेही तितकेच खरे आहे. किंबहुना अशा रीतीने कोणी हिंडल्यास त्याकडे अमेरिकन समाजही फारशा सहानुभूतीने पाहणार नाही, आणि बहुधा तो सार्वजनिक सभ्यतेविरुद्ध गुन्हाही ठरेल.


या संदर्भात साईनफेल्ड मधील द क्याडी या भागातील ज्याकी व क्रेमर यांमधील संवाद आठवला. अवश्य वाचावा. (विकीपानावरील शेवटचा संवाद)