चौथीत असताना पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेसाठी बाबासाहेबांबद्दल वाचन करून भाषण बनवले होते. तेव्हाच या महामानवाबद्दल आदर निर्माण झाला. नंतर लेखात म्हटल्याप्रमाणे 'मुक्ता'चित्रपट पाहिल्यावर त्यांच्याबद्दल हा आदर दुणावला. उपेक्षित लोकांच्या वेदना कळायला लागल्या. 'बलुतं' वाचल्यावर ही असेच झाले. पण नोकरीमुळे बेंगलोरला राहिलो तेंव्हा लक्षात आले की हा माणूस किती मोठा आहे ते. लोकमान्यांनंतर संपूर्ण देशात मान्यता मिळालेले बाबासाहेब हे एकमेव मराठी नेते असावेत.
लेखानिमित्त हे सगळे परत आठवले. चांगला लेख. लिहीत रहा. पुलेशु.
- ओंकार.