तुम्ही राहता तिथे सध्या जर हवेत फार उष्णता नसेल तर आल्याचे पाचक बाहेर ठेवले तरी चालेल. मात्र मीठामुळे त्याला पाणी सुटू शकते. मी घरी आल्याचे पाचक शक्यतो फ्रीजमध्येच ठेवते. त्यात आल्याचा जो क्रिस्पनेस असतो तो तसाच बऱ्याच अंशी राहतो. तीन-चार दिवस तर ते आरामात मस्त राहते. त्यामुळे साधारण तेवढ्या प्रमाणात करावे किंवा रोज फ्रेश करता आले तर अजून उत्तम! मीठापेक्षा काळे मीठ, शेंदेलोण - पादेलोण चवीत व रुचीत अधिक खुमारी आणते!