माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:
या वर्षीचा उन्हाळा मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा तीव्र आहे असे आपल्याला दर वर्षी वाटते. हा उन्हाळाही अर्थात त्याला अपवाद नाही! तापमानवाढ होत आहे की नाही ह्याबाबत अनेक चर्चा घडत आहेत, त्यांचे निष्कर्ष काहीही निघोत, उन्हाळे अधिकाधिक असह्य होत आहेत (की वाटत आहेत?) हे नक्की. पण उन्हाळा काही सगळाच्या सगळा वाईट असतो असे नाही. वाळा, मोग-याचे फूल टाकलेले पाणी, खरबुज, टरबुज, द्राक्षे यांसारखी फळे, पन्हं, लिंबू अशी सरबते, दुपारच्या झोपा, आंब्याच्या रसाची जेवणे नि पत्त्यांचे डाव ह्यांसारख्या गोष्टीही तो आणतोच की. आपल्या आजुबाजुचा निसर्गही ...