तुम्हाला आलेल्या अनुभवाबाबत काही सांगता येणार नाही , परंतु माझ्या पाहण्यात ज्या कोणी गर्भवती स्त्रिया ( मी धरून ) आल्या आहेत , त्या सर्व येणाऱ्या बाळाची हर प्रकारे काळजी घेताना, बाळाशी संवाद साधताना दिसतात. किंबहूना अलिकडे तर गर्भसंस्कार या विषयाचे विशेष प्रशिक्षण सुद्धा काही मुली घेतात किंवा पुस्तके आणि ध्वनिमुद्रिका  ई . तून मिळेल तेव्हढी माहिती मिळवायचा आणि ती होईल तितकी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. हल्ली बहुतेकांचे १ नाहीतर २नच बाळांतपणे होत असल्याने स्त्रिया अतिशय दक्ष असतात असेच मला वाटते. ( पुर्वीच्या काळी आधीच ४ लहान पोरे घरात अस्तील आणि वर सर्व घरकाम यामध्ये बायकाना नवीन येणाऱ्या बाळाकडे आणि स्वतःकडे असे लक्ष द्यायला जमत असेल का , मला तरी वाटत नाही ) तसेच काही अपवादात्मक केसेस सोडल्यास ( ज्याना खरच गरज आहे किंवा पर्याय नाही , किंवा फार महत्त्वाकांक्षी आहेत अशा ) बहुतेक स्त्रिया मिळाल्यास कमी जबाबदारीचे , कमी वेळ असणारे काम ऑफिसमध्ये स्वतःहून मागून घेतात. प्रसंगी प्रमोशन देखिल नाकारतात. असेही दिसून येते.