तब्बेत चांगली असेल आणि फार कष्टाचे काम नसेल तर बाळंतपणाच्या काळातही नोकरी चालू ठेवायला काहीच हरकत नाही. एकाजागी बसून काम असेल तर छोटे मोठे व्यायाम प्रकार डॉ सांगतात. तसेही तब्बेतीची काही तक्रार नसल्यास थोडिफार उठ बस , हालचाल , व्यायाम चालायला जाणे ई. फायदेशीरच ठरते. आणि मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की त्या काळात रीकामे बसण्यापेक्षा डोक्याला आणि मनाला थोडेफार तरी व्यस्त ठेवणारे काम असल्यास चांगले. कारण रीकाम्या वेळाचा जरी चांगला उपयोग करणे, चांगले विचार करणे अपेक्षित असले तरीही काही वेळा चिंताजनक विचार ( जसे की डिलेवरी नीट होईल का ? बाळ हेल्दी होईल ना ई . )  ही मनात येउन उगीचच अस्वस्थ वाटू शकते.

बाळ झाल्यावर मात्र आपल्या सोयी प्रमाणे, गरजेप्रमाणे निर्णय घ्यावा.