थोडा बदल सुचवावासा वाटतो -
मुलाच्या/मुलीच्या आईवडिलांनी घर, जमीनजुमला, खूप पैसा, गुंतवणूक इ. ची तरतूद करण्याचे कारण नाही. स्वेच्छेने, जमेल तितकीच करावी. मात्र पालकांनी मुलाला/मुलीला जमेल तितके उत्तम शिक्षण द्यावे/त्यासाठी प्रोत्साहित करावे आणि पाल्यावर जमतील तितके उत्तम संस्कार करावेत. लग्नाच्या बाबतीत जेव्हा वर/वधू संशोधनाची पाळी येईल तेव्हा सगळा व्यवहारी विचार मुलावर/मुलीवर सोडून द्यावा; त्यांची पसंती, अपेक्षा, व्यवहारी विचार नि निर्णय इ. बाबतीत हस्तक्षेप करू नये. मात्र मुलगा/मुलगी जो निर्णय घेतील त्याची जबाबदारी व निवड पूर्ण त्यांचीच असेल, हे त्यांना पटवून द्यावे. आधीची पिढी आणि नंतरची पिढी अशा दोन दगडांवर पाय ठेवणे विवक्षित कालावधीसाठीच असते. आयुष्याच्या शेवटीपर्यंत साथ देणारे जर कोणी असेल, तर तो म्हणजे आपल्याच पिढीतील आपलाच जोडीदार, हे लक्षात ठेवले की बरेच त्रास कमी होण्याची शक्यता असते.