*एकदा एका गावात एक वाघ शिरतो . सगळे गावकरी मोठ्या पेचात पडतात. तेंव्हा वाघाला मारण्यासाठी शिकारीची आवड असलेला एक माणूस तयार होतो. तो वाघाची शिकार करण्यासठी बंदुक घेऊन निघतो. बराच वेळ होतो ,वाघ काही त्याच्या नजरेस पडत नाही. तहानलेला तो शेवटी नदीकाठी पाणी पिण्यासाठी म्हणून येतो. पाणी पित असताना तो बंदुक बाजुला काढून ठेवतो. आणी नंतर मागे वळून
पाहतो तो काय! समोर वाघ उभा असतो. झाले! समोर साक्षात वाघ ,आणी हातात बंदुकही नाही. तो सरळ डोळे मिटून वाघ कधी येतोय आणी आपला फ़डशा पाडतोय याची वाट पाहात बसतो.मधे थोडा वेळ जातो , आपण अजून जिवंत कसे हे पाहाण्यासाठी म्हणून तो डोळे उघडतो तर काय ! वाघ ' वदनी कवळ घेता ' म्हणत असतो.
*ब्रूसलीच्या आइचे नाव काय असेल?
माऊली !
आणी त्याच्या छोट्या आणी मोठ्या बहिणीचे?
घाकली आणी थोरली !