हरणटोळ आणि महेश यांनी सुचवलेले शब्द हे परवलीचे शब्द नव्हेत. त्यांना सांकेतिक शब्द ही संज्ञा योग्य ठरेल. परवलीच्या शब्दांमुळे बंद दालने खुली होतात, प्रवेश-निर्बंध असल्यास प्रवेश मिळतो. त्या उलट सांकेतिक भाषा म्हणजे इतरांना समजू नये किंवा विशिष्ट लोकांनाच समजावी या हेतूने केलेली शब्दयोजना अथवा रचना. माहितीची, विशेषतः लष्करातल्या गुप्त माहितीची देवाणघेवाण करताना सांकेतिक शब्द अथवा भाषा वापरली जाते. इंग्रजीत कोड वर्ड् अथवा कोड लँग्वेज म्हणतात. आपण कूटशब्द अथवा कूट भाषा असेही म्हणू शकू.
लेख एकंदरीत चांगला झाला आहे.