शबानाताई, अत्यंत अनुभवसमृद्ध असे हे लिखाण आहे. इतकी खोल जाणीव असलेले लिखाण मनोगतावर क्वचितच आढळले आहे.

आपण म्हणता ते खरे आहे. या विषयाबाबत  सामान्य नागरिकांमध्ये कुत्सित उद्गारच अधिक ऐकू येतात. त्यातच आरक्षणाच्या धोरणाची या महामानवाच्या कर्तृत्वाशी सांगड ज़ुळल्यामुळे तेढ आणि द्वेष अधिकच आणि उगीचच वाढला आहे.

तळागाळातल्यांची किंवा त्यांच्यामध्ये वावरणाऱ्यांची मनोगते माध्यमांमधे अलीकडे अलीकडे उमटायला लागली आहेत. संगणक माध्यम हे तर पुष्कळ दूर. साधी अक्षर ओळख जिथे नाही, तिथे संगणक साक्षरता कुठून येणार? तळागाळातल्या लोकांपर्यंत हे आत्मभान जेव्हा झिरपेल, तेव्हा युगानुयुगे अंगी भिनलेली लाचारी आणि गतानुगतिकता टाकून एका नवीन आत्मविश्वासाने आपला भारतीय समाज इतर समृद्ध समाजांच्या पंक्तीला जाऊन बसेल.

आपण लिहीत रहा, आपले अनुभव मनोगतावर मांडीत रहा. लेखनास शुभेच्छा.