केदार,

हे लेखन वाचताना कितीतरी वेळा 'अगदी अगदी' म्हणावेसे वाटते.

काळानुसार पिढी बदलत असते. सध्याची आपली तरुण पिढी अगदीच वाया गेलेली नसली तरी त्यांच्याकडून परिवर्तन घडेल, अशीही अपेक्षा करता येत नाही. मुसोलिनीचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, 'तुमच्या तरुणांच्या तोंडातली गाणी मला ऐकवा. मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो' आजच्या तरुणांच्या तोंडातली गाणीच काय, पण त्यांची देहबोली, जीवनशैली, उथळ, एकांगी आणि अतिव्यक्तीस्वातंत्र्यवादी विचार पाहिल्यानंतर संस्कार किती महत्त्वाचे असतात, हे प्रकर्षाने जाणवते.

मध्यंतरी झी सिनेमाने तयार केलेला 'एंकाउंटर - द किलिंग' हा चित्रपट पाहाण्यात आला. त्यात नसिरुद्दिन शाहने 'इन्स्पेक्टर भरुचा' या पारशी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका अप्रतिम केली आहे. चांगल्या घरातला मुलगा वाईट संगतीने शूटर बनतो. एन्काउंटरमध्ये तो भरुचाकडून मारला जातो. त्याचा देह ताब्यात घ्यायला कुणीच येत नाही. या तरुणाचे उच्चपदस्थ वडील शेवटपर्यंत तो आपला मुलगा नसल्याचे सांगत असतात. शेवटी ते हताशपणे कबूल करतात. 'आपल्याकडून संगोपनात काय कमी पडले? ' असे रडत रडत विचारतात. तेव्हा भरुचा म्हणतो, 'राव साहेब! तुमच्याकडून काही कमी पडले नाही. हाच बेभानपणे चुकीच्या मार्गाकडे वळला आणि त्याचा शेवट सगळ्यांना माहीत असतो. ' पण त्याचवेळी तो हेसुद्धा म्हणतो, की 'आपली मुले कुणाच्या संगतीत राहातात याकडे पालकांनी लक्ष नको का द्यायला? '

मी सरसकट नव्या तरुणाईला दोष देणार नाही. काही आश्वासक करू शकतील असे युवक दिसतात, पण ते फार थोडे आहेत.