'साइनफेल्ड' ही मालिका फारशी पाहिलेली नसल्यामुळे
अरेरे.
असो.
तुमचा याआधीचा पाश्चात्य वेषभूषेच्या संकेतांबाबतचा मुद्दा पटल्यानेच पुराव्यादाखल साईनफेल्डमधील संवादाचा दाखला दिला होता. केवळ अंतर्वस्त्रे घालून रस्त्यावर फिरणारी बाई हा सामाजिक गुन्हा आहे असा या अमेरिकन वकिलाचा मुद्दा मला अधोरेखित करायचा होता. त्यामुळे तुमचे स्पष्टीकरण अनावश्यक वाटले.

शिवाय क्क्क्कुसुम, हम दे दिल चुके सनम व साईनफेल्ड यांची तुलना फारशी पटली नाही. साईनफेल्ड अतुलनीय आहे असे वाटते. (अगदीच शामभटाच्या तट्टाणीचे देशी उदाहरण द्यायचे झाले तर गजरा ह्या मराठी मालिकेतील काही प्रसंगांचे देता येईल.) अर्थात शेवटच्या काही सीझनांमध्ये साईनफेल्डमध्येही थोडासा अनावश्यक आरडाओरडा आहेच. मात्र जॉर्ज कुस्टांझा सारखे पात्र पुन्हा दहा हजार वर्षात निर्माण होणार नाही असे वाटते.