तुमचा याआधीचा पाश्चात्य वेषभूषेच्या संकेतांबाबतचा मुद्दा पटल्यानेच
पुराव्यादाखल साईनफेल्डमधील संवादाचा दाखला दिला होता. केवळ अंतर्वस्त्रे
घालून रस्त्यावर फिरणारी बाई हा सामाजिक गुन्हा आहे असा या अमेरिकन वकिलाचा
मुद्दा मला अधोरेखित करायचा होता. त्यामुळे तुमचे स्पष्टीकरण अनावश्यक
वाटले.
ते लक्षात आले होते. परंतु वाचणाऱ्याच्या 'पर्स्पेक्टिव'प्रमाणे यातून 'अमेरिकेत केवळ अंतर्वस्त्रांनिशी रस्त्यातून फिरणाऱ्या बायका असतात. त्या मालिकेत दाखवलेलेच आहे तसे!' असेही अनवधानाने अधोरेखित होत असल्यासारखे वाटले, म्हणून हा प्रपंच. आपल्या हेतूबद्दल शंका नाही.
शिवाय क्क्क्कुसुम, हम दे दिल चुके सनम व साईनफेल्ड यांची तुलना फारशी पटली
नाही. साईनफेल्ड अतुलनीय आहे असे वाटते.
तुलना क्वालिटेटिव (मराठी?) नाही. साइनफेल्ड फारसा पाहिलेला नसला, तरी त्याबद्दल जे काही ऐकलेले आहे, आणि जे काही अत्यल्प पाहिलेलेही आहे (आता त्यातले काही आठवत नसले तरी), त्यावरून साइनफेल्डच्या दर्जाबद्दल (निदान माझ्या मनात तरी) संदेह नाही; गैरसमज नसावा. तुलनेचा उद्देश केवळ चित्रपटांत किंवा मालिकांत जे दिसते त्यावरून (आपापल्या मगदुराप्रमाणे) एखाद्या संस्कृतीबद्दल सरसकट निष्कर्ष काढणे हे दिशाभूल करणारे ठरू शकते, एवढेच अधोरेखित करणे हा होता.
असो.