लोक तसे वागत नाहीत हेच दुर्दैव. तसे वागण्यातच आपले आणि इतरांचे हित आहे हे कळेल तो सुदिन. परदेशांत हे सर्व कटाक्षाने पाळले जाते. शेकडो वर्षे, अनेक पिढ्या नागरी जीवन जगल्यामुळे त्यांच्यात ही शिस्त जन्मापासूनच अंगी बाणवली जाते. उलट आपल्याकडे नुकते-नुकते शहरीकरण होत आहे. खेड्यातील राहाणीहून शहरी राहाणी वेगळी असते, तिचे नियम वेगळे असतात, हे लक्षात यायला अनेक पिढ्या लोटाव्या लागतील. झोपडपट्टीपुनर्वसनांतर्गत झोपडीनिवासींना बहुमजली उंच इमारतींमधे फ्लॅटस् दिले जातात तिथे काय परिस्थिती उद्भवते ते एकदा डोळ्यां खालून घातल्यास वरील विधानाची सत्यता पटेल‌. संपत्ती  आली म्हणजे सुसंस्कृतता आली असे नव्हे. हेट् द सिन्,नॉट् द सिनर् या उक्तीप्रमाणे असंस्कृततेचा तिरस्कार करावा, असंस्कृतांचा नव्हे.  कितीही राग आला, तरी अज्ञानी लोकांच्या लोकशाहीमध्ये अचानक बदल होत नसतो, क्रांती होत नसते, उत्क्रांतीच होते आणि तीच चिरस्थायी असते. अडाणी लोकांच्या लोकशाहीमध्ये सक्ती करणे शक्य नसते.  असो.