देशी गुलाब म्हटले की त्याला हिंदीचा भपकारा येतो. त्यामुळे गुलकंदाला लागणारा  मराठीतला गावठी गुलाब हाच लाल-गुलाबी पाकळ्यांचा   सुगंधी  गुलाब.
शुद्ध तुपाला हिंदीत देसी घी म्हणतात. मराठीत नुसतेच तूप, किंवा अगदी ताज्याताज्या घरच्या लोण्याला कढवून बनवले असेल तर, साजूक तूप. हिंदीतला परदेस मराठीत परगांव होतो, तर मराठीतला परदेश हिंदीत विदेश. हिंदीतला विदेशमंत्री मराठीत परराष्ट्रमंत्री आणि मराठीतला अर्थमंत्री हिंदीत वित्तमंत्री होतो.
मराठीतले गावठी, गावरान, ग्रामीण, गांवढळ. गावकरी, ग्रामवासी, खेडूत, खेडवळ  आणि ग्राम्य हे शब्द साधारण सारखेच वाटले तरी त्यांना  विविध अर्थच्छटा आहेत.
एकूण काय की, गावठी गुलाब हाच मराठी गुलाब.