<<मुलींच्या अपेक्षा हा जो मूळ मुद्दा आहे तोच प्रेमात पडल्यावर बाद होतो. एकदा 'पडल्यावर' हाच जोडीदार हवा एव्हढीच अपेक्षा शिल्लक राहते. तसे घडल्यास मग बाकी कुठे गटारे आहेत, कुठे काय आहे काही फरक पडत नाही.>>
हे मृदुला यांचे म्हणणे पटले , हेच मला सांगायचे होते.
अजून स्पःट करण्यासाठी एक उदा. देते . माझी एक मैत्रिण दिसायला अतिशय सुंदर , हुशार , कॉंप्यूटर इंजीनीअर , उत्तम कंपनीत नोकरी पगार ३५-४० हजार (लग्नाच्या वेळी ). तिने प्रेमविवाह केला. तर तिचा नवरा फक्त बी. कॉम शिकलेला. पगार १०-१५हजार (लग्नाच्या वेळी ). स्वतःचे घर नाही भाड्याच्या घरात राहणारा. दिसाय्ला अगदीच सुमार - वर्ण काळा , फीचर्स ओबडधोबड ,चेहेऱ्यावर खुप सारे पिंपल. शिवाय त्याचे वडील थोडेसे भ्रमिष्ट. घरात काहीही कारण नसताना आरडा ओरडा करायचे. एव्हढे सगळे असुन्ही तिने त्याच्याशीच लग्न केले. तिच्या आईवडीलाना पसंत नव्हते परंतु तिचा हट्ट म्हणून आणि त्यांच्याच जातीतला मुलगा असल्याने त्यानी हे लग्न लावून दिले. तिचे आता उत्तम चालले आहे. एक मुलगा सुद्धा झाला तिला. तिने स्वतः लोन काढून नवीन २ बेडरुम फ्लॅट सुद्धा घेतला. थोडक्यात ती सुखात आहे. या मुलाशी लग्न करून आपण काही तडजोड केली आहे किंवा आपल्याला याहून चांगले स्थळ मिळाले असते असे काहीही तिच्या मनात सुद्धा येत नाही.
एरवी असे लग्न 'बघुन' होउ शकते काय? अशा मुलाच्या स्थळाला अशा मुलीकडचे बघायला तरी जातील का ?