हे की तिला अशी आई मिळाली. वडील आणि सासरचे तसे बदनामच. पण आई?
मी राणीला घरी आणायला निघाले तर केवढा तमाशा केला ह्यांनी. राणी घरात आली तर मी कायमचा अरण्यात निघून जाईन. आपल्या नशिबाला लागलेलं खग्रास ग्रहण आहे ही मुलगी म्हणजे. असं अद्वातद्वा बोलून स्वतःला जाळून घ्यायला निघाला हा नाटकी माणूस.
राणीला घरी आणायचेच नव्हते म्हणून वडिलांचे कारण पुढे केले असावे काय अशी शंका येते आहे. इतका गंभीर प्रकार असताना खरे तर नवऱ्याला "जायचे तिथे खुशाल जा, जाळून घ्यायचे असेल तर खुशाल जाळून घ्या स्वतःला, आज माझी मुलगी संकटात आहे, मी तिला नक्की घरी आणणार. तिला नोकरी लागून तिच्या पायावर उभी राहीपर्यंत मी तिला माझ्या घरी ठेवणार, माझी मुलगी मला जड नाही " असे सुनावायला पाहिजे होते.
तसेही इतर वेळी वडिलांच्या कर्तृत्वशून्यतेमुळे वडिलांना आई फार किंमत देत असेल असे नाही. विशेषतः ती नोकरी करून पैसे मिळवत असताना. त्यामुळे फक्त राणीच्या वेळी वडिलांचे कारण सांगून मुलीला मदत नाकारणे आणि ती गेल्यावर मोठा तमाशा करून आव आणणे असा आईचा स्वभाव दिसतो. कदाचित ही घरी आली तर खाणारे आणखी एक तोंड वाढेल, मुलगी शिकलेली असली तरी नोकरी लागायची तेव्हा लागेल तोपर्यंत नुसताच खर्च असाही कातडीबचाऊ विचार आईन केला असेल.
"कुपुत्रो जायेत् क्वचिदपी कुमाता न भवती " हे शंकराचार्यांचे वचन खोटे ठरवणारी आई!
विनायक