टग्या चक्रपाणि यांनाही प्रेमात पडल्याची ही एक्साईटमेंट लग्नाआधी जाणवली असावी.

खाजगी मामला आहे, सांगण्याची गरज नाहीच, पण (माझ्यापुरते बोलायचे झाले तर) 'होय' असे उत्तर द्यायला का कोण जाणे, पण संकोच वाटत नाही खरा.  'जिच्या'बद्दल अशी एक्साइटमेंट जाणवली ती ही मुलगी आपली प्रेयसी,(लीडिंग टू) बायको बनण्यास सर्वोत्तम आहे, अशी जाणीवही झाली. दुसऱ्या बाजूने तशी जाणीव झाली किंवा नाही, याबाबत काही महिन्यांनी विचारणा केली असत उत्तर 'होय' असेच मिळाले  इतकेच नाही, तर "आधीच/तेव्हाच हे सगळे का सांगितले नाहीस (मठ्ठा! )?", असा प्रश्नही आला!  बरं आता सांगायचे तरी कसे की इतके महिने थोडा "व्यवहार" पाहण्यात गुंतल्याने सांगायला वेळच मिळाल नाही

मुद्दा एव्हढाच की जोडी जमवण्यासाठी प्रेम आवश्यक.

अगदी! पण या प्रकाराला 'प्रेमविवाह' असे अधिकृतरीत्या म्हटले जात नसल्याने (म्हणावे असा आग्रह नाही! ) हा मुद्दा अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. आणि मग ठरवून केलेला विवाह म्हणजे निव्वळ व्यवहार असतो, नव्हे निव्वळ व्यवहाराव्यतिरिक्त काही असूच शकत नाही, अशा चमत्कारिक कल्पना जन्माला येतात.

मुद्दा प्रेमविवाहाला विरोध किंवा ठरवून केलेल्या विवाहाची भलावण हा नाही. दोन्ही विवाहाचे सारखेच वैध मार्ग आहेत. फक्त, दोन्हींमध्ये सारख्याच प्रकारच्या प्रक्रिया कार्यरत असू शकतात, केवळ एका प्रकारात त्या योगायोगाने होतात तर दुसऱ्या प्रकारात त्या काहीशा जाणूनबुजून, काहीशा नियंत्रित स्वरूपात होऊ शकतात एवढाच फरकही दोन्ही प्रकारांत राहू शकतो, एवढेच मांडण्याचा हा प्रयत्न आहे. आणि नेमके हेच लक्षात न घेतल्याने प्रेमविवाहाला क्वचित्प्रसंगी जनमानसात जे एका प्रकारचे अनावश्यक ग्लॅमर प्राप्त होते, आणि 'तो दुसऱ्या प्रकारचा विवाह म्हणजे निव्वळ व्यवहार असतो' अशा प्रकारच्या ज्या कल्पना निर्माण होतात, त्याबद्दल 'असे काही नसते, त्या दुसऱ्या प्रकारातही निव्वळ व्यवहार असावाच लागतो असे नाही, त्याशिवायही गोष्टी घडू शकतात, आणि बहुधा पहिल्या प्रकाराप्रमाणेच घडतात, फक्त जाणूनबुजून घडतात' हे दाखवून देऊन ते गैरसमज दूर करण्याचा हा उपद्व्याप आहे. अर्थात कोणाला पटले न पटले तरी व्यक्तिशः काहीही फरक पडत नाही.