लेखातली मुलगी तिला त्रास होत असता तर असे वागली नसती असे मला वाटते. तिला गप्पा माराव्याश्या, सह्या कराव्याश्या वाटतात कारण कदाचित बाळाच्या चाहुलीआधी ती तसे नेहमीच करत असावी. त्यातून तिला बरे वाटत असणार, आनंद मिळत असणार. हा प्रकार तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा कंफर्ट (मराठी? ) असणार. म्हणून तिला ती स्थिती बदलायची नसावी. केवळ बाळ होणार म्हणून मित्रमैत्रिणींच्या गटाबाहेर पडायचे नसावे. या दृष्टीकोनात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

प्रलगो, तुम्हाला सगळा वेळ बाळाला द्यावासा वाटतो आहे, कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळेल अशी खात्री आहे. या मुलीला मैत्रिणींशी बोलण्यात जास्त मजा येते आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा, एव्हढेच.