ही ( सुध्दा ) एक सुंदर कथा आहे. कथेमध्ये तसा जास्त पुरावा, गोष्टी नसतांना होम्स कथेचा पुर्ण छडा लावतो, ( मृदुलाने याचे सुंदरच विश्लेषण केलेच आहे.).
१. या सर्व घटनेक्रमातुन कोणाचा तरी होणारा लाभ ( गुन्हा का करावा याचा हेतु स्पष्ट करतो.) याचा विचार होम्सला गुन्ह्याबद्दल खरी दृष्टी देते.
२. टंकलेखन यंत्रांचा प्रेमपत्रे लिहण्यासाठी कल्पक वापर, मेरी च्या नजरेतील दोष, तिची प्रणयासाठीची आतुर अवस्था, त्यातुन तिला सापळ्यात अडकवण्यासाठी केले गेलेल्या क्लुप्त्या, होम्सने मुख्य केंद्रीय कल्पनेचा शोध घेतल्या नंतर त्याला उपयुक्त असणारा पुरावा जमा करणे, कायद्यामधील असणाऱ्या त्रुटी इत्यादीचा सुंदर उहापोह यात केलेला दिसतो.
३. होम्सने या कथेत खऱ्या बदमाषाला अद्दल घडवली नाही याचे आश्चर्य अथवा वैषम्य वाटल्याशिवाय राहत नाही. पण एखाद्या ब्रिटीश माणसाचा विचार केला असता, सदैव अलिप्त राहणे या पैलुचा विचार मनात येतो आणि मनाचे थोडेफार समाधान होते.    

द्वारकानाथ