१९९६चा दसरा/बुद्धजयंती माझ्या मनाला अशीच टोचणी लावून जाणारा दिवस होता. तेव्हा सायंकाळी लिहिलं गेलं डायरीत...

'हे वीरपुरुषा,
तुझ्या नव्या अवताराचा
उषःकाल होत आहेसे वाटते!
प्रार्थना एकच करतो-
व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेऊ नकोस्
व्यक्ति-व्यक्तिंमधून व्यक्त हो!...'

एका सशक्त एकजीव समाजाचे स्वप्न सत्यात उतरू दे! तसा समाज अनुभवण्यासाठी पुनर्जन्म घ्यावे लागले तरी चालतील. या स्वार्थी नेत्यांना मात्र तात्काळ मोक्ष मिळावयास हवा.