"एक गोळी शिकारी" नावाचा शिकारी बराच प्रसिध्द असतो.. त्याची एकच खासियत की, तो शिकार करताना नेहमी बंदूकीत गोळी ठेवूनच शिकार करत असे..
एकदा वासोट्याच्या जंगलात बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला असतो.. त्या भागातल्या ब-याच गाई म्हशींची शिकार त्याने हल्ला केलेला असतो.. गावकरी हैरान होतात आणि "एक गोळी शिकारी" कडे जातात.. "भाई हमको बचाव वह बिबट्या बहूत शेफार गया है.. उसके मुसक्या आवळनेका है, तुम आयेंगे क्या" .. शिकारी - "क्यू नही क्यू नही"
झालं "एक गोळी शिकारी" थेट बंदूकीत एक गोळी भरुन वासोट्याच्या जंगलात पाणवठ्यावर एका झाडावर दबा धरुन बसतो.. २ दिवस वाट पाहील्यावर वाघ पाणि प्यायला येतो.. मागून "एक गोळी शिकारी" उडी मारतो.. आता वाघ आणि "एक गोळी शिकारी" एकदम समोरासमोर..
"एक गोळी शिकारी" नेम धरतो आणि गोळी सोडतो.. वाघ डेंजर चतुर असतो.. तो गोळी चुकवतो.. आणि आता "शून्य गोळी शिकारी" आणि वाघ एकदम समोरासमोर..
वाघ "शून्य गोळी शिकारी" समोर येतो त्याच्या खाडकिनी मुस्काडित देतो आणि निघून जातो.. शिकारी परत येतो.. आणि गावात त्याची बदनामी होते..
"एक गोळी शिकारी" लई जाम भडकतो.. मनातून धुमसत असतो.. तो १ वर्ष तयारी करतो.. डोळ्यावर पट्टी बांधून शिकार करायची तयारी करतो..
पुन्हा "एक गोळी शिकारी" थेट बंदूकीत एक गोळी भरुन वासोट्याच्या जंगलात पाणवठ्यावर एका झाडावर दबा धरुन बसतो.. २ दिवस वाट पाहील्यावर वाघ पाणि प्यायला येतो.. मागून "एक गोळी शिकारी" उडी मारतो.. आता वाघ आणि "एक गोळी शिकारी" एकदम समोरासमोर..
"एक गोळी शिकारी" नेम धरतो आणि गोळी सोडतो.. वाघ डेंजर चतुर असतो.. तो गोळी चुकवतो.. आणि आता "शून्य गोळी शिकारी" आणि वाघ एकदम समोरासमोर..
वाघ "शून्य गोळी शिकारी" समोर येतो त्याच्या खाडकिनी मुस्काडित देतो आणि निघून जातो.. शिकारी परत येतो.. आणि गावात त्याची छी-थू होते..
"एक गोळी शिकारी" आता इरेला पेटतो .. मनातून धुमसत असतो.. तो २ वर्ष तयारी करतो.. डोळ्यावर पट्टी बांधून शिकार करायची परत तयारी करतो.. आणि आवाजावरुन वेध घेण्याचे प्रशिक्षण घेतो.. अमेरिकेत जाऊन प्रशिक्षण घेतो.. परत येतो.. आणि
पुन्हा "एक गोळी शिकारी" थेट बंदूकीत एक गोळी भरुन वासोट्याच्या जंगलात पाणवठ्यावर एका झाडावर दबा धरुन बसतो.. २ दिवस वाट पाहील्यावर वाघ पाणि प्यायला येतो.. मागून "एक गोळी शिकारी" उडी मारतो.. आता वाघ आणि "एक गोळी शिकारी" एकदम समोरासमोर..
"एक गोळी शिकारी" नेम धरतो आणि गोळी सोडतो.. वाघ डेंजर चतुर असतो.. तो गोळी चुकवतो.. आणि आता "शून्य गोळी शिकारी" आणि वाघ एकदम समोरासमोर..
वाघ "शून्य गोळी शिकारी" समोर येतो, शिका-याला वाटतं आता हा परत् मुस्काडित मारणार.. त्याला उगीच कष्ट कशाला.. म्हणून स्वतःहून गाल पुढे करतो..
वाघ - "अरे एक गोळी शिका-या, कर्म दरिद्रि माणसा.. कपाळ-करंट्या .. मला एक सांग एवढी मोठी बंदूक घेवून जंगलात येतो तरी कशाला.. शिकार करायला की मुस्काडित खायला..?
हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा
माधव