योगः चित्तवृत्तिनिरोधः !

ही पतंजली मुनींनी केलेली योगाची व्याख्या आहे.

चित्तवृत्तींचा निरोध इतरांखातर केला तर धार्मिक, स्वतःखातर केला तर मोक्षसाधन.

यातही योग ज्या अर्थाने धार्मिक आहे तो कुठला एक (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध इत्यादी) विशिष्ट धर्म या अर्थाने नव्हे.
तो धर्माचा अर्थ म्हणजे स्वधर्म! मी मनोगतावरच पूर्वी   "स्वधर्म" याविषयावरचे विनोबांचे प्रवचन तपशीलाने लिहीले आहे.
ते यासंदर्भात अवश्य वाचावे.

आपण "व्यवसायाचा"ही उल्लेख शीर्षकात केलेला आहेत. त्यासंदर्भात- योगः कर्मसू कौशलम् ।
म्हणजे व्यवसायात जे जे कर्म आपण करत असू त्यात कौशल्य संपादन करणे ह्याचाच अर्थ योग आहे!