रटाळ, पुराणमतवादी चर्चा आणि एकंदरीत उदासीनता यातून बाहेर काढणारी सुरेख कथा! आभार, मीराताई.
अनुवाद छान जमला आहे. त्यामुळे काही किरकोळ त्रुटी जाणवूनही खटकत नाहीत. उदा. 'न' या शब्दाचा/अक्षराचा वापर. पुरुष 'ना' म्हणतील, 'न' नाही.  माझं हृदय ह्या जगावेगळ्या माणसाबद्दल आदरानं भरून गेलं.  इथे पुरुष 'मन' म्हणतील. 'हृदय' नाही. भाषेच्या वापरात, विशेषतः बोलीभाषेत पुरुष आणि स्त्रिया यांच्यात असा काहीसा फरक असतो.  पण मी म्हटलं तसं, हे फारसं महत्त्वाचं नाही.