ह्यात मी एकच म्हणू शकतो , आणि हो तेही माझे ऊद्दगार नाही श्री जनार्दन स्वामींचे वाक्य आहे.

" माणुस जन्मालाच येतांना गर्भासनातून जन्माला येतो आणि मरतांना शवासनात जगातून जातो ! " हे वैश्विक सत्य कोणता धर्म वा शास्त्र नाकारू
शकेल? त्यामुळे धार्मिक चौकटीत योगास काय औषधिय शाखेस बसविणे मानवतेच्या द्रुष्टिने बसविणे घातकच नाही का? . केवळ हिंदू धर्मपद्धतीत
विकसीत झालेले ज्ञान म्हणून नाकारण्याची ईतर धर्मीयांची  पद्धत आपल्याला नवीन आहे का?

             आणि व्यापाराच म्हणाल तर फुकटच्या ज्ञानाचे मोल मातीमोल असते. आज पर्यंत काय हिंदुस्थानातून काय कमी ज्ञान बाहेर गेलय?,
ज्यांनी ते विकले त्याची किंमत जगाला कळली, आणि जे पारंपारिक रित्या बाहेर गेल, त्यावर इतरांनी स्वामिवत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
मग कोणतही ज्ञान मातीमोल का ठरवाव? साधे कराटे जरी शिकायचे तरी त्याचा क्लास लावावा लागतो, आणि आपण म्हणतो हि जपानची देण आहे
म्हणून . पण स्वसंरक्षणाची ही कला बौद्ध भिक्षुकांनी बुद्ध धर्माचा प्रसार करतांना जगाला दिलेली देणगी. ह्या कलेचा जन्म आपल्याच हिंदुस्थानात
झाला आणि विना मोबदला आपल्याच लोकांनी जगाला अर्पण केले पुढे काय झाल?, सर्वश्रुतच आहे. तेंव्हा ....सर्व जगच आता व्यापारी उंबरठ्यावर आहे, प्रत्येक घरा घरा घरात व्यापारी आहे, अहो जिथे मातेचे ऊदर जिथे भाडेतत्वार मिळायला लागले तिथे इतर गोष्टिंची काय कथा? . ज्या ज्ञानाने चार लोकांचे संसार चालत असतील तरच उपयोग नाही का?. तेंव्हा हे चुक आहे अस
मानन चुकिच आहे!.
कोणाची व्रुत्ती आपण बदलू शकतो काय? त्यांच्या तळ्यापेक्षा दुसर जगच नाही असे जर ते मानत असतील तर त्याला तुम्ही आंम्ही काय करणार?


सर्वे भवन्तू सुखिनः
सर्वे संतू निरामया         

 आपण हेच म्हणू ! हिच आपली परंपरा आहे!.