स्त्रीपुरुष समानतेच्या युगात मुलांच्या पालकांनी अवास्तव अपेक्षा करू नये हे जितके खरे तेवढेच मुलीनेही नवरा म्हणून अपेक्षित मुलगा आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ असायलाच हवा अशी अपेक्षा बाळगणे कितपत योग्य ?

ह्या बाबतीत डिमांड सप्लाय हा मुद्दा काढला तर तो फार कुणाला आवडणार नाही. पण मला सांगा समजा अशा 'अवास्तव' किंवा एखाद्याच्या मते अवाच्यासवा अपेक्षा एखाद्या मुला मुलीची असेल तर पुढे येणाऱ्या स्थळांच्या संख्येवरून अनुभवावरून काहीतरी तडजोड होतच असणार की. आणि समजा कुणाला काहीही तडजोड नकरता असा जोडीदार मिळाला तर चांगलेच आहे.

मला वाटते आपण काय अपेक्षा ठेवल्या होत्या आणि येणाऱ्या प्रतिसादांवर अवलंबून आपण आपल्या अपेक्षांशी काय काय तडजोडी केल्या ते नंतर विसरले तरी जात असावे किंवा एकदा लग्न जमल्यावर त्या कुणाला सांगणे योग्य नाही असे वाटत असावे.