या छोट्या लेखातून नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही. दरेक मागच्या पिढीला पुढची पिढी बिघडलेली दिसत असते त्यातला प्रकार वाटला. म्हणजे १०० वर्षांपूर्वी चहा पिण्यावर टीका आता बिअर पिण्यावर!

आता सगळ्यांना 'इंटरनेट' उपलब्ध आहे. सगळ्यांना 'ब्लू टूथ' वापरता येतो
यात काय वाईट आहे?

संपूर्ण निर्व्यसनी, भरपूर अभ्यास करणारा, भारत देशासाठी गुणात्मक काम करण्याची महत्वाकांक्षा ठेवणारा आणि पालकांनी पाहून दिलेल्या मुलीशीच लग्न करणारा प्रकारही अस्तित्वात आहे.

हे सगळे गुण एकाच मनुष्यात असावे असा आग्रह का? म्हणजे भारत देशासाठी गुणात्मक काम करणारा माणूस पालकांनी पाहून दिलेल्या मुलीशीच लग्न करेल असे नाही. मग तुम्ही काय त्याला मधल्या गटात घालणार का?

आणि डूड आणि हंक असण्यात काय वाईट आहे? माझ्या माहितीत असे कितीतरी तरूण डूड आहेत जे आपल्या गर्लफ्रेंडसकट काहीतरी विधायक कामे करत असतात.