शल्यचिकित्सकाने सुरी वापरणे आणि लूटमार करणार्याने ती वापरणे यातला फरक सारासार विचाराने सहज लक्षात येतो.  कर्करोगाच्या वेदनांनी ग्रस्त रुग्णाला एखादा अमली पदार्थ देणे आणि नशा करण्यासाठी तो वापरणे यातही हा फरक आहेच. एकच वाक्य स्वधर्म विसरून हतवीर्य झालेल्याला धर्मायुद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी बोलता येते, आणि जीवावर उदार होऊन अतिरेकी कारवाया करणार्याला चिथावणी देण्यासाठी बोलता येते. संदर्भ सोडून शब्दांचा विपर्यास करणे फार सोपे आहे.

बाकी कसाब ला प्रशिक्षण देणार्यांचे आणि अर्जुनाला स्वधर्म पाळण्यास प्रवृत्त करणाऱ्या श्रीहरीचे  शब्द तेच आहेत म्हणून त्यांना एकाच तागडीत घालायचे का हा विवेक ज्याने त्यानेच करायचा आहे.