सदर लेखकाची एकंदर वाटचाल पाहता, त्याचे सुरस आणि चमत्कारिक लेखन हे एक तर 'विचार' (१ लेख) किंवा दुसरे म्हणजे 'अनुभव' (प्रस्तुत लेख धरून ८ लेख) या दोहोंपैकी एका प्रकारात मोडते, असे लक्षात यावे.

प्रस्तुत लेख हा 'विचार' या प्रकारात मोडावा असे वाटत नाही. त्यामुळे, वरील निकषाप्रमाणे तो 'अनुभव' या सदरात मोडावयास प्रत्यवाय नसावा.

अवांतर: 'अनुभव' या सदरात  लेखकाने कोणाकडून तरी ऐकलेल्या आणि लेखकाला ज्यांच्या सत्यासत्यतेबद्दल किंवा शक्याशक्यतेबद्दल काहीही कल्पना नाही अशा कानगोष्टी (पहा: शेवटची ओळ) आणि ज्यांचा शेवट बदलण्यास लेखकास यत्किंचितही प्रत्यवाय नाही अशा कथा यांचाही समावेश होऊ शकतो, हे ज्ञान मला नव्याने झाले, त्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार.