सुरेख  चित्रांबद्दल छान

+१.

शीर्षकावरून वाटलेली 'बापरे! तरुण मुलींच्या समस्या या विषयावरचा आणखी एक लेख! ' ही भीती अनाठायी ठरवल्याबद्दल हुश्श!

-२.

१. 'उमलत्या कळ्या' या शीर्षकातून 'तरुण मुली' सूचित होऊ शकतात, हे जरी मान्य करण्यासारखे असले, तरी 'तरुण मुलींच्या समस्या' सूचित होतात, हे पटत नाही. उलटपक्षी, तरुण मुलींबद्दल काही उत्साहवर्धक, सकारात्मक लेखन असावे अशी शंका निर्माण होते. (अर्थात, लेख 'तरुण मुलींच्या समस्यां'बद्दल असण्याबद्दलच्या निष्कर्षामागे 'तरुण मुली' = 'समस्या' यासारखे काही गृहीतक असल्यास गोष्ट वेगळी; मात्र, त्या परिस्थितीत, अशा सरसकट स्वरूपाच्या आणि अन्यायकारक गृहीतकास आक्षेप नोंदवू इच्छितो.)
२. प्रस्तुत लेखिकेची आजवरची वाटचाल पाहता तिच्याकडून 'तरुण मुलींच्या समस्या' या विषयावरच्या (आणखी एका) लेखाची  अपेक्षा आपोआप निर्माण होते, असे वाटत नाही. (किमानपक्षी, प्रस्तुत प्रतिसादलेखकाकडून 'साठोत्तरी दशकातील मराठी नवकविता' या विषयावरचे एखादे दीर्घविवेचन, किंवा 'मध्ययुगीन लढायांतील वितळलेल्या शिशाचा* वापर आणि किल्ल्यांची तदानुषंगिक स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्ये' अशा विषयावरील, 'जरा बेताने! रस डोक्यात जाईल!'** अशासारखे काही शीर्षक असलेली, एखादी माहितीपूर्ण लेखमालिका येण्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक तर नाहीच नाही. शेवटी जेणूं काम तेणूं थाय. आणि ज्याचीत्याची आवड, ज्याचात्याचा रस.) त्यामुळे, तशी भीती ही एवीतेवी तशीही अनाठायी असल्याकारणाने, ती तशी ठरल्यास त्यात 'हुश्श!' म्हणण्यासारखे काही वाटत नाही.

अर्थात, प्रस्तुत लेखिकेकडून 'तरुण मुलींच्या समस्या' या विषयावरील एखादा लेख खरोखरच आल्यास कदाचित नेमक्या याच कारणास्तव तो अपेक्षाभंग स्वागतार्ह ठरावा, हा भागही आहेच.

असो.

*    किंवा, उकळत्या तेलाचा.
** किंवा, 'या, मालक! घाणा गरमागरम आहे!'.