एकदा एक टोपी विक्या एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतो.
वाटेत लागते जंगल - टोपी विक्या जंगलातल्या एका झाडाखाली बसून डब्बा खायला लागतो.... डब्बा खाऊन वर पाणी पिउन मोठ्ठी जांभई देतो. एकदा इकडे तिकडे बघतो व झाडाखाली पथारी टाकून झोपतो.
माकडे सर्व काही बघत असतात.. तो झोपी गेल्यावर एक माकड खाली उतरून येते.... टोपी घेउन झाडावर जाउन बसते.... नंतर अजून एक येते, टोपी घेउन झाडावर जाउन बसते..... असे करता करता त्या टोपी विक्याच्या पेटीतल्या सगळ्या टोप्या माकडे घेउन झाडावर जाउन बसतात.
टोपी विक्या उठतो.... तोंड पाण्याने धुवून पेटीकडे बघतो तर काय ? माकडांनी सगळ्या टोप्या पळवून नेलेल्या...... आता काय करायचे ?
त्याला युक्ती आठवते ...... तो डोक्यावरची टोपी दाणकन जमीनीवर आपटतो.....
एक माकड ते बघतं आणी सरसर झांड उतरून खाली येते. टोपी विक्याच्या पुढ्यात उभे राहते व खाडकन त्याच्या मुस्कटात मारून त्याला म्हणते..... "शाण्या - आजोबा पणजोबा काय फक्त माणसांनाच असतात का ?"