विनायक जी, मनपूर्वक धन्यवाद. गीतेचा 'भाष्यकारते वाट पुसत' अभ्यास केल्याचा उपयोग होतोच.
बाबा महाराज आर्वीकरांचा 'गीता प्रबोध' पण हिन्सा, स्वधर्म या संदर्भात मोलाचे भाष्य करतो. प्रा. वि. पु. आपटे यानी पूर्णवादाधारे गीतेची अधिदैवीक, अधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तीन खंडात विभागणी करून अभिनव पद्धतीने मांडणी केली आहे. त्यानी मांडलेले विचारही मोलाचे आहेत. हे ग्रंथ माझ्या संग्रही आहेत. त्यातले काही वेचे इथे द्यायला आवडले असते. मी दीर्घ मुदतीकरता परदेशी वास्तव्यास असल्याने दुर्दैवाने ते शक्य होणार नाही.