मीराताई,
अनुवाद मस्तच झाला आहे. सहज आणि सोपा अनुवाद वाचायला खूपच मजा आली. ही कथा मला विशेष आवडणाऱ्या होम्सकथांपैकी एक आहे. त्यामुळे जास्त आनंद झाला.
मात्र काही ठिकाणी अनुवाद थोडासा शब्दशः केल्यासारखा वाटला.
शिवाय कार्र्वाई हा शब्द मराठीत कारवाई असा लिहितात असे वाटते. हा शब्द कार्यवाही या शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे की काय अशी कधीकधी शंका येते. अकूणच अनुवाद मस्त झाला आहे. प्रतिक्रिया द्यायच्या बाबतीत माझं घोडं वरातीमागून आलं आहे याबद्दल चुटपुट लागली आहे 
अदिती