दसकाळी प्रशंसा, दुपारी माघार, संध्याकाळी आपल्याला समजले नाही पण अहंकार स्वस्थ बसू देत नाही ही कबूली आणि सकाळी परत नवा लेख! अशा मानसिकतेला बोध दुरापास्त! - सहमत. आपण सुचवता त्याप्रमाणे खजिल न होता आत्मपरीक्षण करतो. धन्यवाद.
त्यात आणखी मजा म्हणजे कालचा एक प्रतिसाद तर मी उत्तर देण्यापूर्वीच मागे घेतला गेला (किंवा प्रशासकांनी बाद केला) - प्रशासकानी बाद केला. अनुदार, अनुचित उद्गार होते. प्रशासकांचे आभार.
आता अश्या परिस्थितीत मानसिकता सैरभैर होणे स्वाभाविक आहे. - सहमत
मी माझं म्हणणं अत्यंत बुद्धीनिष्ठ पद्धतीनी मांडतो - काहीसा सहमत
मला कुणाच्याही वक्तव्यांचे दाखले द्यावे लागत नाहीत - ओशो, अष्टावक्र, गुर्जिएफ यांचे दाखले असतात. एखादी गोष्ट रामानी सांगितली म्हणून सत्य होत नाही. ओशोनी सांगितली म्हणूनही सत्य होत नाही. एखाद्याचा व्यक्तिगत (सब्जेक्टिव) अनुभव त्याने मोठ्या अधिकारवाणीने सांगितला म्हणून सर्वसमावेशक, जागतिक सत्य ठरू शकत नाही आणि त्या अविर्भावात सांगू नये हे आपणास मान्य आहे का? मी आता हाफिसात जातो. गीता विषयक पोस्ट ला यथावकाश मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.