शवासन हे योगातल एक आसन आहे. सर्व आसन केल्यानंतर शरीराचा ताण घालविण्यासाठी केले जाणारे हे आसन. सर्वात शेवटचे आसन असते.
ह्या आसनात माणुस डोळे मिटून पाठिवर शांत पडून राहतो. त्यावेळेस शरीराचा श्वास मंद चालत असतो म्हणून हे आसन करणारा शवासारखा
भासतो म्हणून ह्यास शवासन म्हणतात. त्याच्या शरीराच्या अवयवांची हालचाल स्वाभाविक रीत्या बंद असते
आणि कोणतही शव हालचाल करत नाही , त्या गेलेल्या शरीराची हालचाल नैसर्गिक रीत्या बंद होते , जणू काय
तो देह चिर विश्रांती घेत असतो म्हणून ह्या आसनाला शवाचीच उपमा दिलेली आहे अस मला वाटत . ह्यात फरक एवढाच की आसनात तुम्ही
ताजे तवाणे झाल्यावर पुर्ववत हालचाल करू शकता,आणि गत प्राण झाल्यावर नाहि. बाकी सर्व समान असते