पण मी काहीही उपदेश करत नसताना स्वतःवर ओढून घ्यायच...

एकदा 'जगातल्या कुणीही क्रमवार उत्तरे द्या' म्हटल्यावर, 'जगातल्या कुणीही'मध्ये माझा समावेश होत नाही काय? 'होत नाही' असे आपले म्हणणे असल्यास आपण माझे अस्तित्व नाकारत आहात, असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

अर्थात, त्यानेही मला काही फरक पडत नाही म्हणा. 'मी विचार करतो, म्हणजे मी आहे' हे देकार्तेचे वचन मला दिलासा द्यायला पुरेसे आहे.

(उलटपक्षी, 'आपण विचार करीत नाही, म्हणजे आपण नाहीत' असा उलटा दावा करून आपले अस्तित्वही मी नाकारू शकतो. त्याप्रमाणे खरोखरच जर आपले अस्तित्व नसले, तर अर्थात आपल्यालाही त्याने फरक पडू नयेच. अर्थात, फरक पडत असल्यास आपले अस्तित्व आपण सिद्ध करालच; परंतु त्यासाठी माझ्या 'आपण विचार करत नाही, म्हणजे आपण नाहीत' या तर्कातील त्रुटी आपणास दाखवून द्यावी लागेल. नाही दाखवलीत तरीही मला काही फरक पडत नाही म्हणा!)

बाकी, आपण दिलेल्या दुव्यातील मी मांडलेले मुद्दे हे त्या चर्चेच्या अनुषंगाने अवांतर अथवा निरर्थक आहेत असे मला वाटत नाही. आपल्याला तसे वाटत असल्यास आपला तो अधिकार आहेच; त्याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या मुद्द्यांवर आपण काहीही विचार केलेला नाही, एवढाच निष्कर्ष त्यातून मी काढू शकतो. अर्थात, माझ्या समजुतीप्रमाणे आपल्याला अस्तित्व नसेलच, तर त्याने आपल्याला काही फरक पडू नयेच; उलटपक्षी आपल्याला अस्तित्व असले आणि त्यामुळे आपल्याला काही फरक पडला, तर त्यामुळे मला फरक पडू नये. झाली फिट्टंफाट!

(परंतु मी तरी कशाला अस्तित्व नसलेल्या आपल्या नावाखाली एका पोकळीला लांबलचक प्रतिसाद देण्यात ऊर्जा वाया घालवतोय?)

माझ्या प्रतिसादाचा दुवा उद्धरून लाइमलाइटात आणल्याबद्दल आपल्या नास्तित्वाचे आभार!