सूर्यमंदिरांविषयीचे शाळेत असताना वाचलेले एक पुस्तक व एका दिवाळी अंकात वाचलेला देवतांच्या आदानप्रदानाविषयीचा लेख यावरून सूर्य इंपोर्टेड आहे असे म्हटले. संदर्भ ठोसपणे उपलब्ध नाहीत याबद्दल क्षमस्व.
वाचलेल्या माहितीत, सूर्याने (म्हणजे सूर्याच्या मूर्तीत दाखवलेले) घातलेले चामडी जोडे हा सूर्य इराणी/ फारसी प्रांतातला मूळ देव असल्याचा पुरावा आहे असे म्हटल्याचे आठवते. मूळ लेखात (दिवाळी अंकातल्या) कर्णाचे 'सूर्यपुत्र' असणे, त्यातला सूर्य तो एकच का वेगळा. हनुमानाने गिळायचा प्रयत्न केला तो कोणता. ह्या कथा कोणत्या कोणत्या कालखंडात प्रचलित झाल्या इत्यादी माहिती असल्याचे आठवते.